ई.गर्व्हर्नंस

ई गव्हर्नन्स

महाराष्ट्र शासनाच्या ई गव्हर्नन्स धोरणाच्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद पालघर तर्फे कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयीन स्तरावर विविध उपाय योजना केल्या असुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली सामान्य प्रशासन विभागात माहीती व तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच शासनाच्या ई गव्हर्नन्स धोरणानुसार जिल्हा परिषदेत खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर दिल्या जाणा-या सेवा

G2C (Government to citizen) सेवा:

१.नमुना ८ असेसमेंट दाखला- नमुना ८ मध्ये नागरिकाची नोंद असावी व त्याने विहित नमुन्यात 

ग्रामपंचायत ला अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

२. दारिद्र्य रेषेखालील दाखला- दारिद्र्य रेषेमध्ये नागरिकाचे नाव असावे व त्याने विहित नमुन्यात 

ग्रामपंचायत ला अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

३.जन्म दाखला- जन्माची नोंद ग्रामपंचायत ला असावी व त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला 

अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

४.मृत्यू दाखला- मृत्यूची नोंद ग्रामपंचायत ला असावी व त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला 

अर्ज करावासोबत आधार कार्ड जोडावे.

५.विवाह दाखला- विवाहाची नोंद ग्रामपंचायत ला असावी व त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत

ला अर्ज करावासोबत आधार कार्ड जोडावे.

६.थकबाकी नसल्याचा दाखला- नागरिकाने त्याने विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला अर्ज करावा व 

सोबत आधार कार्ड जोडावे.

७.निराधार असले बाबतचा दाखला- कुटुंब प्रमुखाचा मृत्यू दाखला विहित नमुन्यात ग्रामपंचायत ला 

अर्ज करावा व सोबत आधार कार्ड जोडावे.

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ४२० सेवा ऑनलाईनपध्दतीने महाऑनलाईनने विकसीत केलेल्या प्रणालीमार्फत (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) दिल्या जातात. या साठी  नागरिकाने आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन या सेवांसाठी विहित नमुन्यात मागणी करावी.

B2C (Business to Citizen)सेवा:

  1. मोबाईलरिचार्ज

  2. टी.व्ही. रिचार्ज

  3. इन्शुरन्स भरणा

  4. रेल्वे तिकीट बुकिंग

  5. लाईट बिल भरणा

  6. गॅस बुकिंग

  7. बँक सेवा

  8. PANकार्ड  सेवा 

* जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ- सामान्य जनतेला जिल्हा परिषदे तर्फे राबविण्यात येणा-या शासनाच्या  विविध योजनांची सन्मा पदाधिकारी तसेच विभागांची माहिती विभाग प्रमुख, माहिती अधिकार व तत्सम आवश्यक माहिती https://zppalghar.gov.in उपलब्ध वर करुन देण्यात आलेली आहे.

* जिल्हा परिषदे मधील मुख्यालयातील सर्व संगणक लॅनव्दारे जोडण्यात आलेले असुन. कर्मचा-यांसाठी आवश्यक ईंन्टरनेट उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

* कार्यालयीन वापरासाठी तसचे गोपणीय अहवालासाठी शासकिय विभाग व अधिकारी , कर्मचारी यांचे शासकिय मेल बनविण्यात येतात. 

* शासकिय खरेदि विक्रीसाठी GEM portal चा जास्तीत जास्त उपयोग केला जातेा. Gem वर Registration करणे तसेच अडचणींचे निराकरण करण्यात येते.

* व्हिडिओ कॉन्फरंस - जिल्हा परिषद पालघर येथे स्वतंत्र व्हिडियो कॉन्फरसिंग कक्षाची स्थापना करण्यात आली असुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी हे प्रत्यक्ष VC व्दारे शासनाच्या वेळोवेळी घ्येण्यात येणा-या आढावा तसेच उपक्रमात सहभाग घेतात.

* सीसीटीव्ही कॅमेरे- सर्व इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. कॅमे-याचा Display मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या दालनात बसविण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या कामजाकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी. तसचे इतर काही आपत्कालीन परिस्थ‍ितीवर नियंत्रण ठेवण्यसाठी जिल्हा परिषदेतील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील संगणाकावर होते.

* विविध आज्ञावल्या (Software)- जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या सर्व विभागांमध्ये विविध आज्ञावल्या (Software) कार्यान्व‍ित आहे. याचे वेळोवळी अदययावत करणे तसेच अहवाल मिळविणेसाठी उपयोग केला जातेा.

* सोशल साईट - जिल्हा परिषदेमध्ये जनसंपर्क अधिकारी पद कार्यान्वित असुन त्यांच्या मार्फत Facebook, Instagram, twitter, you tube, आदि चॅनल मार्फत जिल्हा परिषदेच्या विविध योजना, उपक्रमांचे सादरीकरण  केले जाते तसेच प्रचार प्रसिध्दी केली जाते.

* SMS प्रणाली- जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एकाच वेळी माहिती होण्याच्या दृष्टीने जि.प. मार्फत SMS प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. याचा उपयोग महत्वपुर्ण सुचना माहिती तसेच इतर अनुषांगीक गोष्टी केल्या जातात.

* मानव संपदा- जिल्हा परिषद कर्मचारी यांचे सेवापुस्तक Online करणे संदर्भात शासनाचे निर्देश आहेत यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची नोंदनी पुर्ण करण्यात आली आहे.

* आपले सरकार पोर्टल- नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल सुरु करण्यात आले आहे. विविध विभागामार्फत सदर तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदे मार्फत प्रयत्न केले जातात.