बंद

    मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची सफाळे येथे दत्तक बालकाच्या घरी भेट; पोषणासोबत कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर

    जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी केवळ उपाययोजना न करता प्रत्येक कुपोषित बालकाच्या आरोग्याची प्रत्यक्ष जबाबदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने कुपोषित बालक दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तसेच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सफाळे येथील ठाणेपाडा अंगणवाडीत दत्तक घेतलेल्या हार्दिक निलेश परेड या बालकाची भेट घेऊन त्याच्या आरोग्य व पोषणस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.