बंद

    G.आर. आर (आबा) पाटील सुंबर गांव पुरस्कार योजना

    ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय दि. 21.11.2016 च्या निकषानुसार पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांना आर. आर (आबा) पाटील सुंबर गांव पुरस्कार योजनेंतर्गत तालुका सुंदर गांव म्हणून  निवड केलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10.00 लाख पुरस्काराची रक्कम अदा केली जाते. तसेच निवड केलेल्या तालुका सुंदर मधून जिल्हा सुंदर गांवाची  निवड करणेत येते,  जिल्हा सुंदर गांव म्हणून निवड करणेत आलेल्या ग्रामपंचायतींना 40.00 लाख  पुरस्काराची रक्कम अदा करणेत येते.

    सन 2016-17 ते 2019-20 पर्यंत प्रती वर्ष 8 ग्रामपंचायतींना तालुका सुंदर गांव म्हणून निवड करून त्यांना पुरस्काराची रक्कम अदा करणेत आली आहे, तसेच सन 2016-17 ते 2018-19 पर्यंत 3 ग्रामपंचायती व सन 2019-20 मध्ये 2 ग्रामपंचायतींना विभागून जिल्हा सुंदर गांव म्हणून निवड करून पुरस्काराची रक्कम अदा करणेत आली आहे.

    आर. आर (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय दि. 21.11.2016 च्या निकषानुसार  विकाम कामे करणेत आली आहेत.