वारली चित्रकला
जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी सामाज्याने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य हि त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे.
वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारपणे ११०० वर्षापासून जतन केलेली आहे.
या चित्रकलेमधे आदिवासी समाज्याच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन होणाऱ्या घडामोडी,आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा. लग्न,नृत्य विविध सण निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखवले जातात.
हि चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायीनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू, उदा, माती, तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रुश वापरून काढली जातात.
हि कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागाणी आहे.