- बुडीत मजुरी योजना
- उद्देश: बाळांतपणात महिलांना आराम करणे आवश्यक आहे अनुसूचित जाती-जमातीच्या व बीपीएल धारक सर्व महिलांना बाळांतपणानंतर ताबडतोब कामावर जावे लागु नये व या काळात बाळाची विशेष काळजी घेतली जावी म्हणुन लागु केलेली योजना
- योजनेच्या अटी व पात्रता
- मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हयातील अनुसूचित जाती- जमाती व बीपीएल धारक सर्व महिला.
- दुसऱ्या व त्या पुढील खेपेच्या गरोदर महिलांना लाभ दिला जाईल.
- आवश्यक कागदपत्रे
- राष्ट्रीयकृत बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स प्रत
- लाभार्थी महिलेचे आधारकार्ड
- गरोदरपणाचे नोंदणी कार्ड
- रहिवासी दाखला
- प्रसुती कार्ड
- महिलेचा फोटो
- योजनेचा लाभ –
- गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासुन रु.२०००/-
- बाळांतपणानंतर रु.२०००