बंद

    नवसंजीवनी योजना

    • उद्देशः विविध उपायांच्या माध्यमातून आदिवासी भागातील नागरिकांचे सर्वंकष आरोग्य विविध विभागांच्या समन्वयातून व उपायांच्या माध्यमातून सुधारणे आणि कुपोषणाला आळा घालणे, माता व बालक मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
    • कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सेवा-सुविधाः
      • भरारी पथकांद्वारे आदिवासी भागातील गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी, बालकांची आरोग्य तपासणी.
      • मातृत्व अनुदान योजने अंतर्गत आदिवासी गरोदर महिलांना चांगला आहार मिळावा यासाठी 400 रु. रोखीने व 400 रु. किमतीची औषधे पुरविण्यात येतात.
      • दाई बैठक योजने अंतर्गत दुर्गम भागातील बाळंतपणाची व नवजात शिशुंची 100 टक्के नोंदणी होईल यासाठी प्रयत्न तसेच जोखमीच्या मातांचे व नवजात बालकाच्या आरोग्याचे सर्वेक्षण.
      • पावसाळी काळात बालमृत्यू रोखणे व साथीचे रोग टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, त्यासाठी बालकांची तपासणी व लसीकरण करणे.
    • सेवा – सुविधा मिळण्याचे ठिकाणः
      • आदिवासी भागातील शासकीय आरोग्य केंद्र, फिरते आरोग्य पथक आणि स्थानिक दाई.
    • अधिक माहितीसाठी संपर्क व हेल्पलाईन क्र.:
      • आपल्या जवळच्या दाई, आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
      • जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
      • अधिक माहितीसाठी 104 या हेल्पलाईनवर कॉल करा.