- उद्देशः
- माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
- महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण वाढवणे.
- लाभार्थीः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला
- लाभाचे स्वरूपः
- बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये.
- बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकीत आरोग्य केंद्रात झाल्यास
- शहरी भागात -रु. 600/-
- ग्रामीण भागात – रु. 700/-
- सिझर झाल्यास रु. 1500/-
- सदर योजनेचा लाभ बाळंत महिलेच्या बँक खात्यावर डी.बी.टी., पी.एफ.एम.एस.द्वारे देण्यात येतो.
- आवश्यक कागदपत्रेः
- MCP कार्ड आणि RCH नंबर
- बाळंत महिलेचे बँक पासबुक
- माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
- आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
- जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
- 104 या हेल्पलाईनवर फोन करा.