बंद

    दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थ सहाय्य देणे

    योजनेचे स्वरूप आदिवासी व ग्रामीण भागातील दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी मदत करणे.
    योजनेचे उद्दिष्ट आदिवासी व ग्रामीण भागातील दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी मदत करणे.
    योजनेचे लाभार्थी दुर्धर आजार शस्त्रक्रिया झालेली 6 वर्षापर्यंतची बालके.
    लाभाचे स्वरूप दुर्धर बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी शासकीय निधी व्यतिरिक्त प्रती लाभार्थी जास्तीत जास्त 50,000/- मात्र अनुदान संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे
    पात्रतेचे निकष दुर्धर आजार शस्त्रक्रिया झालेली 6 वर्षापर्यंतची बालके.
    आवश्यक कागदपत्रे परिपुर्ण भरर्लेला अर्ज, दुर्धर आजार शस्त्रक्रिया झाले बाबत आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत.
    कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता 005, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (प)
    योजनेच्या अटी व शर्ती दुर्धर आजार शस्त्रक्रिया झालेली 6 वर्षापर्यंतची बालके.
    अर्ज करण्याची पद्धती अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे