बंद

    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

    ग्रामस्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. ग्रामीण जनतेस हा कार्यक्रम आपला वाटावा व त्याचे महत्व पटवुन त्यांना उत्स्फूर्त सहभाग मिळावा या दृष्टिकोनातून सनन 2000-2001 पासून  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. तसेच  सन 2002-03 पासुन स्वच्छतेशी  व ग्रामविकासाशी निगडीत एखादया विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायना तालुका,जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला.  सन 2018 – 19 पासुन शासन स्तरावरुन दरवर्षी नव्याने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2018-19 पासून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील  उत्कृष्ट प्रभागास व जिल्हा परिषदेतील गटातील स्वच्छता क्षेत्रात भरीव काम  करणाऱ्या उत्कृष्ट  ग्रामपंचायतीस बक्षिस प्रदान करण्यात येत  आहे.