दि. 20 ऑक्टोबर, 1998 च्या शा. नि. अन्वये सदर शिष्यवृत्ती देण्यात येते.
क्षेत्र :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी संस्कृत भाषेच्या गुणवत्ता शिष्यवृत्त्या केंद्र शासनाकडून दिल्या जातात.
लाभार्थी :- सदर परीक्षेत विद्यार्थ्यास इयत्ता 8वी मध्ये संस्कृत विषयात प्राप्त केलेल्या गुणवत्तेवर इ. 9वी व इ. 10वी आणि इयत्ता 10वी च्या गुणवत्तेवर इ. 11वी व इ. 12 मध्ये ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
फायदे :- इ. 9वी व इ. 10वी मध्ये दरमहा 100 रु. असे एकूण दहा महिने योजनेचा लाभ घेता येतो. तसेच इ. 11वी व इ. 12वी मध्ये दरमहा 125 रु. असे एकूण बारा महिने योजनेचा लाभ घेता येतो.
योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाशी संपर्क साधणे.