बंद

    शाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे

    योजनेचे स्वरूप ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींच्या त्यांचे राहत्या घरापासुन शाळेपर्यतचे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणा-या मुलींना दोन चाकी सायकल योजनेचा लाभ दिला जाईल.
    योजनेचे उद्दिष्ट शाळेत जाणा-या आर्थीकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटूंबातील मुलींना वेळेवर शाळेत पोहोचता यावे, त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.
    योजनेचे लाभार्थी इ.5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुली.
    लाभाचे स्वरूप शाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे.
    पात्रतेचे निकष

    ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींच्या त्यांचे राहत्या घरापासुन शाळेपर्यतचे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणा-या मुलींना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

    क्र.1 प्रमाणे लाभार्थी संपल्यानंतर 1 कि.मी. पेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थीनींना लाभ देण्यात येईल. इ.5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुली.

    आवश्यक कागदपत्रे परिपुर्ण भरर्लेला अर्ज, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत
    कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता 005, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (प)
    योजनेच्या अटी व शर्ती इ.5 वी ते 12 वी मध्ये शिकणा-या मुली
    अर्ज करण्याची पद्धती अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे