बंद

    विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे.

    योजनेचे स्वरूप राज्य स्तरावर क्रिडा, कला, शिक्षण सन 2024-25 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे योजने मध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत करणेत येईल.
    योजनेचे उद्दिष्ट

    राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य  मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे व विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत करणे.

    आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (BPL) मुलींना विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना 10 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत करणे

    योजनेचे लाभार्थी

    राज्य स्तरावर क्रिडा, कला, शिक्षण सन 2024-25 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुली.

    10 वी कमीतकमी 75 % टक्के गुण

    लाभाचे स्वरूप विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना रक्कम रु.10,000/- लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
    पात्रतेचे निकष राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य  मिळविलेल्या मुली – 10 वी कमीतकमी 75 % टक्के गुण
    आवश्यक कागदपत्रे परिपुर्ण भरर्लेला अर्ज, 10 वी उत्तीर्ण  प्रमाणपत्र, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत
    कार्यान्वित यंत्रणा संपूर्ण पत्ता 005, महिला बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (प)
    योजनेच्या अटी शर्ती

    राज्य स्तरावर क्रिडा, कला,शिक्षण अशा विविध क्षेत्रात सन 2023-24 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुली.

    10 वी कमीतकमी 75 % टक्के गुण

    अर्ज करण्याची पद्धती अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे