बंद

    राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्त्या (RIMC) (लेखाशिर्ष – 22021198)

    योजना प्रारंभ :- दि. 25.07.2017 च्या शा.नि. अन्वये, जानेवारी 2017 पासून (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे) कडून आयोजन

    क्षेत्र :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून ही प्रवेश परीक्षा जून व डिसेंबर अशा दोन सत्रात घेतली जाते.

    लाभार्थी :- सदर परीक्षेत विद्यार्थी पात्र असावा. मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7वी वर्गात शिकत असलेला किंवा इयत्ता 7वी मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी. तसेच प्रवेश घेतेवेळी  त्या विद्यार्थ्याचे वय दि. 01 जानेवारी रोजी साडेअकरा वर्षांपेक्षा कमी व 13 वर्षांपेक्षा अधिक नसावे. परीक्षार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

    फायदे :- योजनेंतर्गत दोन्ही सत्रातील मिळून एकूण चार विद्यार्थ्यांची प्रतिवर्षी निवड करण्यात येते. निवड झालेल्या विद्यार्थ्याला इ. 8वी ते इ. 12वी पर्यंत असे पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते.

    योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाशी संपर्क साधणे.