योजने बद्दल माहिती :
राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अंतर्गत बायोगॅस उभारणी करीता केंद्र शासनाच्या अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण गटासाठी रक्कम रू. १४,३५०/- प्रति संयत्र अनुसूचित जाती व जमाती रक्कम रु. २२,०००/- प्रति संयत्र शौचालय जोडणी केल्यास रक्कम रु. १,६००/- प्रति संयत्र. जि.प. सेस फंड अंतर्गत प्रति सयंत्रणास र.रू. १२,०००/- पुरक अनुदान देय आहे.
लाभार्थी: सर्व घटकातील शेतक-यांना लाभ घेऊ शकतात परंतु सदर लाभार्थ्यांकडे २ ते ३ जनावरे असली पाहिजेत. तसेच ७/१२, ८अ असणे आवश्यक आहे.
फायदे:
- बायोगॅस हा पारंपारीक इंधनाला उत्तम पर्याय आहे
- बायोगॅस निर्मिती बरोबर चांगल्या प्रतिचा सेंद्रिय खत, उत्तम कंपोस्ट खतामुळे रोग जंतु व तणांच्या बियापासून होणारा प्रसार रोखण्यास मदत होते.
- वायुप्रदुषण रोखण्यास मदत होते.
- ग्रामीण भागात मानवी विष्ठेचा मल:निसारणाचा उत्तम मार्ग यामुळे आयोग्य विषयक समस्या पासून सुटका होते.
- महिलांची घुराच्या त्रासापासून मुक्ती होते. गॅस सिलेंडर टंचाईवर उत्तम पर्याय तसेच आर्थिक बचत होते.
- ५ ते ६ व्यक्तिंच्या कुटुंबाचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक, नाष्टा, पाणी गरम करणे या गोष्टी होऊ शकतात.
- महिन्याला साधारण दोन गॅस सिलेंडरची बचत होते. लाकडाची बचत होते पर्यायाने निसर्गाचे संरक्षण होते.
- उत्तम सेंद्रिय खत स्लरी रूपाने उपलब्ध होते.
अर्ज कसा करावा-
विहित नमुन्यामध्ये तालुका स्तरावर ऑफलाईन अर्ज करावा. अधिक माहिती करीता जिल्हा स्तरावर – कृषी विकास अधिकारी व तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधावा.