योजनेचे स्वरूप |
महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. साहित्य पुरविणे. |
योजनेचे उद्दिष्ट |
आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे व महिलांना सक्षम करण्यासाठी हातभार लावणे. |
योजनेचे लाभार्थी | वय 18 ते 50 दरम्यानच्या महिला. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य |
लाभाचे स्वरूप |
पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. साहित्य घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे |
पात्रतेचे निकष | वय 18 ते 50 दरम्यानच्या महिला. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य. |
आवश्यक कागदपत्रे | परिपुर्ण भरर्लेला अर्ज, लाईट बिल, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत. |
कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता | 005, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (प) |
योजनेच्या अटी व शर्ती | वय 18 ते 50 दरम्यानच्या महिला. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य. |
अर्ज करण्याची पद्धती | अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे |