- उद्देशः
- गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे.
- माता व बाल आरोग्य सुधारणे.
- लाभार्थीः
- पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे.
- ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाखापेक्षा कमी आहे.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.
- पात्र लाभार्थी ज्यांच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध आहे.
- ज्या महिला अंशतः (40 टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)
- बी.पी.एल. रेशनकार्ड असलेली महिला.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी.
- ई-श्रम कार्ड असलेली महिला.
- किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
- मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला.
- अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका
- लाभाचे स्वरुपः
- पहिल्या अपत्यासाठी :
- पहिला हप्ता – रु.3,000/- : 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंदणी. किमान एक बाळंतपणापूर्वी तपासणी करुन घेणे आवश्यक.
- दुसरा हप्ता – रु.2,000/- : बालकास पेंटा – 3 पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. (14 आठवड्यांपर्यंत)
- दुसऱ्या अपत्यासाठी – (मुलगी असेल तर) एक रकमी रु. 6,000/-: जन्म दाखला असणे आवश्यक व बालकाचे पेंटा 3 पर्यंतचे (14 आठवडे) लसीकरण झालेले असणे आवश्यक
- पहिल्या अपत्यासाठी :
- आवश्यक कागदपत्रेः
- लाभार्थीचे आधार कार्ड
- गरोदरपणाचे नोंदणीचे कार्ड, बाळाचे लसीकरण कार्ड
- लाभार्थीचे आधार कार्ड जोडलेले व DBT स्नेही बँक खाते
- माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
- आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका,
- अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
- जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
- अधिक माहितीसाठी 14408 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फोन करा.
- पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे.