पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा पावसाळ्यापूर्वी (नोव्हेंबर ते मे) व पावसाळ्यानंतर (जुन ते ऑक्टोबर) या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करुन जैविक तपासणीसाठी उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्याचे अभियान राबविण्यात येते. तसेच ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी उपविभागीय प्रयागशाळेत पाठविण्यात येतात.
शाळा, अंगणवाडी , FHTC तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करुन सदर नमुन्यांची FTK संचाद्वारे जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येते.
सदरचे पाणी नमुने जलसुरक्षकांमार्फत WQMIS ॲप या ॲप्लीकेशनद्वारे गोळा करुन उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येतात.तसेच, वर्षातून दोन वेळा पावसाळ्यापूर्वी (1 एप्रिल ते 30 एप्रिल) आणि पावसाळ्यानंतर 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. सदर सर्वेक्षणानंतर ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे किंवा लाल कार्ड वितरित करण्यात येते