- निवृत्त वेतन शाखा महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) 1982 अन्वये वर्ग 3 च्या बाबतीत 58 वर्ष तर वर्ग 4 च्या बाबतीत 60 वर्ष सेवा पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त तसेच इतर प्रकारे सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या प्रकरणांची छाननी करणे व मंजुरी देणे,निवृत्ती वेतन प्रदान आदेश निर्गमित करणे,सुधारीत निवृत्तीवेतन प्रकरणे हाताळणे.
- निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनार्ह लाभाची प्रकरणे सादर करण्यामध्ये खाते प्रमुख आणि गटविकास अधिकारी स्तरावर विलंब होत असतो. निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनार्ह लाभ मंजुरी मधील विलंब टाळणे व जलद गतीने प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने निवृत्ती वेतन प्रकरणे मंजुरीसाठी संगणक तज्ञाच्या सहाय्याने संगणक प्रणालीव्दारे निवृत्ती वेतन मंजुरीची कार्यवाही जुलै २०२१ पासून वित्त विभागाकडून सुरु करण्यात आलेली आहे.