योजना प्रारंभ :- 3 मे, 2003 (2021-22 पासून इ. 9 वी ते इ. 12 वी पर्यंतच्या धार्मिक अल्पसंख्यांक मुलींसाठी सदर योजनेची अंमलबजावणी संचालनालय, योजना यांचेमार्फत केली जाते).
क्षेत्र :- शासनमान्यता प्राप्त सर्व व्यवस्थापनाच्याअनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इ. 9 वी ते इ. 12 मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील पात्र विद्यार्थिनी.
लाभार्थी :- इ. 9 वी ते 12 मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील सर्व मुली.
फायदे :- इ. 9 वी व इ. 10 वी च्या मुलींना वार्षिक 5000/- रु. तर इ. 11 वी व इ. 12 वी च्या मुलींना वार्षिक 6000/- रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.
अर्ज कसा करावा :- योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येते.