बंद

    दिव्यांग महिलांना लघुउद्योगाकरिता साहित्य पुरविणे

    योजनेचे स्वरूप

    पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई

    मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. साहित्य  पुरविणे.

    योजनेचे उद्दिष्ट

    आदिवासी व ग्रामीण भागातील दिव्यांग महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे.

    त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे व सक्षम करण्यासाठी हातभार लावणे.

    योजनेचे लाभार्थी वय 18 ते 50 दरम्यानचे दिव्यांग महिला
    लाभाचे स्वरूप

    पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई

    मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ. घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंक खात्यात देणे

    पात्रतेचे निकष वय 18 ते 50 दरम्यानचे दिव्यांग महिला
    आवश्यक कागदपत्रे परिपुर्ण भरर्लेला अर्ज, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडील 40% अथवा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र, लाईट बिल, आधारकार्ड, स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, आदिवासी क्षेत्रात असल्यास ग्राम सभा ठरावाची प्रत्र, बॅक खाते पासबुकाची प्रत.
    कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता 005, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद पालघर, तळमजला, नविन प्रशासकीय इमारत, कोळगाव, पालघर (प)
    योजनेच्या अटी व शर्ती वय 18 ते 50 दरम्यानचे दिव्यांग महिला
    अर्ज करण्याची पद्धती अंगणवाडी सेविका मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्पाधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बालकल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे