बंद

    दिव्यांग पशुपालक शेतकर्यांना शेळी गट (10+1 ) खरेदीसाठी ९०% अनुदानाने अर्थसहाय्य

    जिल्हातील अपंग पशुपालकांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे व पशुपालकाचे उत्पन्न वाढवणे. शेळीगट (10+1 ) शासनाने विहित केलेले रक्कम रु.६८,000/- आहे. जिल्हा परिषद ९०% अनुदान रु. ६१२००/- निर्धारित आहे. शेळीगट (10+1 ) चा  विमा व वाहतूक खर्च लाभार्थीने स्वता करावयाचा आहे.

    आपत्कालीन परिस्थितीत दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य करणे

    नैसर्गिक व आपात्कालीन परिस्थितीमध्ये उदा.  पूर /अतिवृष्टी/ वीज कोसळून /डोंगरदरीत पडून जनावर मृत / वाडा कोसळून अथवा जळून जनावर सर्पदंश / विष बाधेने / रेबीज आजार  / गंभीर आजाराने अचानक मरण पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना  तात्काळ अर्थसहाय्य करणे हा योजनेचा उद्देश आहे.