बंद

    जिल्हा परिषद स्वनिधी (सेस फंड योजना)

    योजने बद्दल माहिती :

    .क्र. जि.. सेस फंड योजनेचे नाव प्रारुप
    किडरोगांचे नियंत्रण किडरोग नियंत्रणासाठी रासायनिक व जेविक किटकनाशके / बुरशीनाशकांची व तणनाशके इ. खरेदी करीता  अनुदान देणे
    शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे , साहित्य व इतर बाबी पुरवठा विविध पिक संरक्षण अवजारे व तार कंपाउंड करीता अनुदान देणे
    शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व  सुधारित कृषि अवजारे, कृषि प्रक्रीया उदयोगांकरीता साहित्य पुरवठा हस्तंचलीत व स्वयंचलीत सुधारित कृषि अवजारे अवजारांवर (उदा. मळणीयंत्र. ताडपत्री, गवतकापणी यंत्र, चापकटर, काजु प्रक्रिया यंत्र,  दातेरी विळे, नारळ झावळया कापणी यंत्र,HDPE/PVC पाईप, शेड नेट, मंल्चिंग पेपर तसेच इतर मान्यताप्राप्त शेती उपयोगी सुधारीत अवजारे व यंत्र सामुग्री यांचेसाठी 50% अनुदान देणेत येईल.
    शेतीसाठी सिंचन साहित्य पुरवठा करणे डिझेल/ पेट्रोडिझेल,विदयुत, सौर पंप इ.  जल उपसा सिंचन साधने तसेच ठिबक सिंचन संच  ५० % अनुदान देणेत येईल.
    बायोगॅस बांधणीकरीता पुरक अनुदान देणे बायोगॅस बांधणीकरीता पुरक अनुदान देणे
    शेतकरी शिबिर, प्रात्याक्षिके व प्रदर्शने तसेच कृषि शैक्षणिक सहली आयोजित करणे शेतकरी शिबिर, प्रात्याक्षिके व प्रदर्शने आयोजित करणे व  शेतकऱ्यांचा आभ्यास दौरा आयोजीत करणे.
    शेतक-यांना बियाणे संच पुरवठा करणे भात, उडीद, तुर, हरभरा  इत्यादी तसेच  भाजीपाला मिनीकिट पुरवठा करणे
    महिला किसान शक्ती पंख योजना (ड्रोन खरेदीकरीता अर्थसहाय्य)

    महिलांच्या  ग्रामसंघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनी  यांना कृषी सेवा प्रदान करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाने सुसज्ज करून सक्षम करणे आणि शाश्वत उपजीविका निर्मितीला हातभार लागेल. ड्रोन तंत्रज्ञानामुळे खते, कीटकनाशके आणि तणनाशके अचूकपणे वापरणे, समान वितरण आणि इष्टतम वापर सुनिश्चित करणे यासारख्या आधुनिक शेती पद्धतींमध्ये प्रगत कौशल्ये आत्मसात करता येतात. रसायनांचा अतिरेकी वापर कमी करुन शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे.

     

    कृषि प्रक्रीया संयंत्र खरेदीकरीता अर्थसहाय्य (सोलर ड्रायर)

     

    हंगामी भाज्या व फळांचं त्या त्या हंगामात उत्पन्न इतकं जास्त येते  की, अत्यंत अल्प दरात शेतकऱ्यांना त्यांचा माल विकावा लागतो. हंगामाच्या काळात तर बऱ्याचदा यांचे वाया जाण्याचे  प्रमाण खूपच जास्त असते. हंगाम सरल्यानंतर नाशवंत शेतीमाल उपलब्ध होण्यासाठी तसेच हंगामात वाया जाणारा शेतीमाल वाळविण्याकरीता सोलर ड्रायर खरेदीकरीता अनुदान उपलब्ध करुन देणे.  शेतीमाल वाळविण्याकरीता सोलर ड्रायर चा वापर केल्यास स्वच्छ, धुळविरहीत, सुकलेला व उच्च प्रतीचा शेतीमाल बनविणे शक्य होईल. तसेच मत्स उत्पादने वाळविण्यासाठी सोलर ड्रायर चा वापर करुन पारंपारीक पध्दतीमुळे होणारे नुकसान कमी करणे.

     

    १० शेतीत बांबु लागवड करणे

    बांबु लागवड करणा-या शेतक-यांना प्रोत्सहनपर अनुदान देणे तसेच शेतक-यांच्या शेतावर/बांधावर/ पडीक जमिनीवर बांबु पिकांची लागवड करून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करणे व याद्वारे शेतक-यांचे स्थलांतर रोखण्यासाठी मदत करणे व त्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे.

     

    ११

    कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करीता अर्थसहाय्य करणे

     

    शेतात लागवड होणा-या पिकांवर मजुरीच्या खर्चात व वेळेची बचत करणारी विविध कृषि अवजारे नसल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होत नाही. म्हणूनच शेतक-यांना अनुदानाने कृषि अवजारे खरेदीकरीता अनुदान उपलब्ध करुन देणे.  व शेतक-यांच्या उत्पादनात वाढ करणे. तसेच पारंपारीक शेतीला यत्रिकीकरणाची जोड देणेकरीता कृषि अवजारे खरेदीकरीता अनुदान उपलब्ध करुन देणे.

     

    १२

    शेतकऱ्यांना सिंचनासाठी नविन विहिर खोदकाम व बांधकाम करणे

     

    शेतकऱ्यांना सिंचनासाठी नविन विहीर खोदकाम व बांधकाम, जुनी विहिर दुरुस्ती व शेततळे अस्तरीकरण करीता अर्थसहाय्य करुन शाश्वत पाण्याचा स्त्रोतनिर्माण करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व जीवनमान उंचावणे.

     

     

    १३ आधुनिक शेतीस प्रोत्साहन देणे व नाविन्यपुर्ण योजना राबविणे.

    ·         लाकडी शिडी )Scaffolding)  तयार करून त्याचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देणे

    ·         मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना देणे.

    ·         शेतकरी/शेतमजूर/बचतगट/शेतकरी उत्पादक गट यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य पुरविणे.

    ·         यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.

    ·         वेलवर्गीय भाजीपाला लागवड साठी मांडव तयार करण्याकरीता अर्थसहाय्य

    ·         मशरुम लागवडसाठी अर्थसहाय्य

     

     

    लाभार्थी : सर्व घटकातील लाभार्थी अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांकडे ७/१२, ८अ असणे आवश्यक आहे.

    फायदे: शेतक-यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य ५०% अनुदानाने उपलब्ध करून मिळते. शेतक-यांना आधुनिक शेती करण्यास प्रोत्साहन मिळते तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

    अर्ज कसा करावा –

    पंचायत समिती स्तरावर विहित नमुन्यामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहिती करीता तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याकडे संपर्क साधावा.