बंद

    जिल्हा परिषद – जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना

    2 दुधाळ गाई/म्हशी गट वाटप, 10+1 शेळी गट वाटप

    या योजनेंअंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थीना स्वयंरोजगाराद्वारे उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे . या योजने अंतर्गत खालील योजनांचा सामावेश आहे .

    दोन दुधाळ जनावरांचे वाटप –(अनुसूचित जमाती लाभार्थी )

    दोन दुधाळ जनावरांचे शासनाने विहित केल्यानुसार एका गाईची रक्कम रु. ७००००/- व एका  म्हैसीची रक्कम रु. ८००००/-आहे.  या योजनेअंतर्गत ७५% शासकीय अनुदान रु १,१७,६३८/-  दोन गाईसाठी व रु १,३४,४४३/- दोन  म्हैस साठी विम्यासह निर्धारित आहे .

    शेळी गट (10+1 ) वाटप (अनुसूचित जमाती लाभार्थी )

    शेळीगट (10+1 ) शासनाने विहित केलेली  रक्कम रु.७८२३१/- आहे. ७५% शासकीय अनुदान रु. ५८६७३ /- विम्यासह निर्धारित आहे.