बंद

    जलयुक्त शिवार

    मृद जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.जशिअ-2022/प्र.क्र.302/जल-7 दि.03.01.2023 अन्वये, जलयुक्त शिवार अंतर्गत शिवार अभियान राबविण्यात आले गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर सदर आराखडयास जलयुक्त शिवार अभियान 2.0 तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद जलसंधारण विभाग कळवा ठाणे यांचेकडून दि.18.1.2024,01.02.2024 02.02.2024 अन्वये प्रशासकिय मान्यता आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पालघर जिल्हयातील एकूण 63 कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. सदर कामात मुख्यत्वे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून विहिर नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदर कामातून गावशिवारातील पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे.