केंद्र शासनाने दिनांक 25.12.2019 रोजी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC –Functional Houshold Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्ता पुर्ण् पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हयांतील सर्व वाडया वस्त्यातील प्रत्येक कुटुंबाला टप्प्या-टप्प्याने वैयक्तिक नळाद्वारे पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. याबाबत जल जीवन मार्गदर्शक् सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हयांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत. त्यात अशा वैयक्तिक तळ जोडणी साठी सुधारणात्मक पुनर्जोडणी (रेट्रोफिटिंग) च्या कामाचा समावेश केला आहे.