बंद

    जननी सुरक्षा योजना (JSY)

    • उद्देशः
      • माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
      • महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण वाढवणे.
    • लाभार्थीः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला
    • लाभाचे स्वरूपः
      • बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये.
      • बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकीत आरोग्य केंद्रात झाल्यास
        • शहरी भागात -रु. 600/-
        • ग्रामीण भागात – रु. 700/-
        • सिझर झाल्यास रु. 1500/-
      • सदर योजनेचा लाभ बाळंत महिलेच्या बँक खात्यावर डी.बी.टी., पी.एफ.एम.एस.द्वारे देण्यात येतो.
    • आवश्यक कागदपत्रेः
      • MCP कार्ड आणि RCH नंबर
      • बाळंत महिलेचे बँक पासबुक
    • माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः
      • आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.
      • जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
      • 104 या हेल्पलाईनवर फोन करा.