बंद

    कस्तुरबा गांधी बालिका योजना

    योजनेचे स्वरुप

    कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) हि योजना  शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गटातील उच्च प्राथमिक स्तरावरील मुलींसाठी सुरु करण्यात आलेली आहे. दारिद्रय रेषेखालील मुली ज्या काही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन आलेल्या, शाळाबाह्य  मुली, अन्यथा एक पालक ह्यात असलेल्या, घटस्फोटीत / परितक्त्या पालकांच्या मुली, शाररिक  अपंगत्वामुळे  अक्षम असलेल्या, विशेष गरजा असणाऱ्या  शाळाबाह्य मुली व नैसर्गिक आपत्ती असलेल्या पालकांच्या मुली अशा मुलीना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे .

    योजनेचे निकष

    दारिद्रय रेषेखालील मुली ज्या काही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, इतर ठिकाणीहून  स्थलांतरित होऊन आलेल्या, शाळाबाह्य मुली, अन्यथा, एक पालक ह्यात असलेल्या, घटस्फोटीत  /  परितक्त्या  पालकांच्या मुली, शाररिक  अपंगत्वामुळे  अक्षम असलेल्या,  विशेष गरजा  असणाऱ्या  शाळाबाह्य मुली व नैसर्गिक आपत्ती असलेल्या पालकांच्या मुली  अशा मुलीना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रवेश दिला जातो.