बंद

    संस्कृती

    वारली चित्रकलाvarli painting

    जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी सामाज्याने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य हि त्यांच्या समाजजीवनाची ओळख आहे.
    वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारपणे ११०० वर्षापासून जतन केलेली आहे.
    या चित्रकलेमधे आदिवासी समाज्याच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन होणाऱ्या घडामोडी,आदिवासींच्या दैनंदिन जीवनात होणारे प्रसंग उदा. लग्न,नृत्य विविध सण निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखवले जातात.
    हि चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायीनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणाऱ्या वस्तू, उदा, माती, तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या काड्यांचे ब्रुश वापरून काढली जातात.
    हि कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागाणी आहे.

    Tarpaतारपा नृत्य

    वारली समाज उत्सवप्रिय आहे तसेच यासमाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते. रात्री चंद्र दिसल्यावर नृत्य चालु होते आणि मग मध्यरात्री पर्यंत ते चालू असते. रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर होणारे हे नृत्य म्हणजे सामूहिकनृत्याचा उत्कृष्ठ उदाहरण आहे. ‘तारपा’ हे एक प्रकारचे वाद्य (wind instrument) आहे. सुकलेला भोपळा आतून कोरून, पोकळ बनवून हे वाद्य तयार करतात. नृत्य स्थानाच्या मध्यभागी एकजण तारपा वाजवत असतो. एक स्त्री आणि एक पुरुष असे एकानंतर एक गोलाकार हातात हात गुंफून नृत्य करतात. नृत्याच्या वेळी तारपा वाजवणार्‍याच्या दिशेने सर्वजण पाठमोरे असतात. आणि हे पुर्ण नृत्य असेच पाठमोरे पुढे जातच करतात. नृत्य करताना वारली स्त्रिया केसांचा अंबाडा घालतात. तारपा नृत्यात वारली आदिवासी हातात हात गुंफून गोलाकार नृत्य करीत असल्याने हे नृत्य म्हणजे त्यांच्या सहकार्याचे प्रतिबिंबच आहे.

     

    bohada

    बोहाडा

    बोहाडा उत्सव पालघर जिल्ह्यातील जव्हार, तलासरी, मोखाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बोहाडा उत्सवाला अडीचशे वर्षाहून मोठी परंपरा आहे. ह्या उत्सवात आदिवासी बांधव कलाकार आपल्या डोक्यावर विविध देवदेवतांचे मुखवटे घालतात आणि अन्य कलाकारवाजंत्री आणि संबळ वाजवतात. त्या तालावर मुखवटे घातलेले कलाकार नाचतात. त्यांना अन्य आदिवासी बांधव नाचण्यासाठी मदतही करतात.हे मुखवटे आदिवासी कलाकार उंबर, साग ह्या लाकडापासून स्वतः तयार करतात. ‘बोहाडा’ हा शिमगा उत्सवासारखा आदिवासी संस्कृतीचा एक भाग असतो. वारली कलेप्रमाणे हस्तकौशल्य वापरून लाकडात कोरीव काम केले जाते. हे मुखवटे आदिवासींच्या परंपरागत देवता तसेच  रामायण, महाभारत ह्यातील देवता ह्यांचे बनविले जातात. या उत्सवात देव, देवी, दैत्य, हिंस्त्र श्वापदे, ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंगे घेत पुराणकथा सादर केल्या जातात. गणपती, सरस्वती, रक्तादेवी, कालिका, दैत्य, राम, रावण, हनुमान अशी कितीतरी सोंगे घेतली जातात. मुखवटे व त्यांबरोबरच प्रभावळी बांधून ही सोंगे नाचत मंडपात, दरबारात येऊन सूत्रधार, गाडीवान यांच्या सहकार्याने पुराणकथा सादर करतात. या उत्सवांत सामान्यतः उत्सव सांगतेच्या आदल्या रात्रभर सोंगे नाचविण्याची प्रथा आहे. या उत्सवास भवाडा, लळीत असेही म्हणतात. देवीच्या आवाहनापासून सांगतेपर्यंत पूजाअर्चा, वारी घेणे (अंगात संचार होणे) यांबरोबरच विधिनाट्यात्मधारणेसह लोकनाट्य तमाशा सादर करण्याची प्रथा आहे.

    चिकू महोत्सव

    या प्रदेशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात चिकू उत्पादन आणि इतर कृषी-आधारित उपक्रमांवर अवलंबून आहे. अलिकडेच डहाणू-घोलवडला चिकूच्या दर्जेदार उत्पादनासाठी “भौगोलिक मानांकन” प्रदान करण्यात आले आहे. चिकू महोत्सव आयोजित करण्यामागील उद्देश म्हणजे या प्रदेशात उद्योजकता विकासाला चालना देणे. त्यानंतर हा महोत्सव बोर्डी येथील लोकांसाठी एक परंपरा बनला. २०१३ मध्ये सुरू झालेला चिकू महोत्सव हा राज्य कृषी विभाग आणि स्थानिक संस्थांच्या पाठिंब्याने एमटीडीसीचा एक उपक्रम आहे. त्याची प्रासंगिकता वाढविण्यासाठी, स्थानिक लोकांकडून हा कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यामुळे हा महोत्सव प्रत्येक वेळी यशस्वी होतो. चिकूचे उत्पादन डहाणू प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचे आहे. यामुळे या महोत्सवाचे नाव “चिकू महोत्सव” ठेवण्याची कल्पना सुचली. हा महोत्सव एकाच ठिकाणी स्वादिष्ट पदार्थ, मजेदार उपक्रम, शेती भेटी आणि आनंदाचे केंद्र घेऊन येतो.या प्रदेशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात चिकू उत्पादन आणि इतर कृषी-आधारित उपक्रमांवर अवलंबून आहे. अलिकडेच डहाणू-घोलवडला चिकूच्या दर्जेदार उत्पादनासाठी “भौगोलिक मानांकन” प्रदान करण्यात आले आहे. चिकू महोत्सव आयोजित करण्यामागील उद्देश म्हणजे या प्रदेशात उद्योजकता विकासाला चालना देणे. त्यानंतर हा महोत्सव बोर्डी येथील लोकांसाठी एक परंपरा बनला. २०१३ मध्ये सुरू झालेला चिकू महोत्सव हा राज्य कृषी विभाग आणि स्थानिक संस्थांच्या पाठिंब्याने एमटीडीसीचा एक उपक्रम आहे. त्याची प्रासंगिकता वाढविण्यासाठी, स्थानिक लोकांकडून हा कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यामुळे हा महोत्सव प्रत्येक वेळी यशस्वी होतो. चिकूचे उत्पादन डहाणू प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचे आहे. यामुळे या महोत्सवाचे नाव “चिकू महोत्सव” ठेवण्याची कल्पना सुचली. हा महोत्सव एकाच ठिकाणी स्वादिष्ट पदार्थ, मजेदार उपक्रम, शेती भेटी आणि आनंदाचे केंद्र घेऊन येतो.

    chikoo festiv

    डहाणू महोत्सव

    डहाणू महोत्सव हा डहाणूच्या किनारपट्टीवर आयोजित केला जाणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो स्थानिक संस्कृती, कला, हस्तकला आणि ग्रामीण जीवनशैलीचे प्रदर्शन करतो. डहाणू नगरपरिषद आणि महसूल विभागाच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात पर्यटकांना शेती, लोककला, ट्रेकिंग, आणि साहसी क्रियाकलापांचा अनुभव मिळतो. डहाणू नगरपरिषद व महसूल विभागाकडून आयोजित केले जाते. स्थानिकांना आर्थिक हातभार लागतो, पर्यटकांना डहाणूच्या पर्यटन स्थळांची ओळख होते, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन मिळते.dahanu fes

    केळवा महोत्सव

    केळवा पर्यटन महोत्सव २०२५ पालघर जिल्ह्यातील केळवा बीच येथे आयोजित करण्यात आला होता. हा उत्सव १८ ते २० एप्रिल २०२५ या दरम्यान पार पडला. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आयोजित करण्यात आले होते, ज्यांचा उद्देश केळवा पर्यटन स्थळाचा प्रचार करणे हा होता.
    मुख्य मुद्दे:

    हा एक वार्षिक महोत्सव आहे, जो केळवेच्या समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांमध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी आयोजित केला जातो

    केळवे येथे पर्यटन आणि स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘केळवा बीच पर्यटन महोत्सव’ साजरा केला जातो, ज्यामध्ये विविध स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा यांचा समावेश असतो.WhatsApp Image 2025-08-25 at 2.56.25 PM