बंद

    वैयक्तिक शौचालय

    केंद्र शासनाने  15 ऑगस्ट 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन योजना सुरु केली  आहे. स्वच्छ भारत  मिशन (ग्रामीण) या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पायाभुत सर्वेक्षणांनुसार पात्र असलेल्या कुटुंबास वैयक्तिक शौचालय प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येतो. पालघर जिल्हा 02 ऑक्टोंबर 2017 रोजी राज्यातील 12 जिल्हा हागणदारी मुक्त जिल्हा घोषित करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छतेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यत येतात.