बंद

    पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

    कालावधी प्रारंभ  – २०१७

    कालावधी समाप्त – २०२४

    क्षेत्र –  NA

    जागेची उपलब्धता

    १. ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा व गावठाण हद्दीबाहेरील निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूरी दिलेल्या जागा.

    २. जिल्हाधिकारी वा शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय/संपादित जागा.

    ३. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 25 चौ.मी घरकुलाचे बांधकाम करता येऊ शकते. याव्यतिरिक्त इतर मुलभूत सुविध यासाठी घरकुलाच्या सभोतालची जागा गृहित धरल्यास साधारणपणे 500 चौ.फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    ४. प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी 500 चौ.फुटापर्यंत असल्यास प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रु. 1,00,000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य लाभार्थ्यांस देण्यात येईल.

    ५.जागेची किंमत रु. 1,00,000/- पेक्षा जास्त असल्यास व त्यावरील रक्कम लाभार्थी स्वत: देण्यास तयार असल्यास त्यास या योजनेचा लाभ देण्यात येईल.

    अर्ज कसा करावा – गटविकास अधिकारी पंचायत समिती येथे संपर्क करावा.