बंद

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

    योजना प्रारंभ :- इ. 9 वी व इ. 10 मधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी.

    क्षेत्र :- शासनमान्यता प्राप्त सर्व अनुदानित शाळा.

    लाभार्थी :- इ. 9 वी व इ. 10 वी मधील दिव्यांग विद्यार्थी पण, अट अशी आहे की, सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 40% पेक्षा जास्त असावे.

    फायदे :- दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार शासनाकडून वार्षिक 2000/- रु. ते 4000/- रु. अशी मदत शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.

    अर्ज कसा करावा :- योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येते.

    योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाशी संपर्क साधणे.