What's New

विभाग व योजना

ग्राम विकास अधिकारी-श्री. नितीन पवार, उमरोळी ग्राम पंचायत पालघर जिल्हयातील ५६ ग्राम पंचायती ना संत गाडगेबाबा महाराज ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत पुरस्कार मिळाले त्या सर्व ग्रामपंचायतींची कामगिरी ही कौतूकास्पद असून सर्व लोकप्रतिनिधीना अभिमान वाटावा अशीच आहे. दि २७ जुलै रोजी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे जिल्हा परिषद पालघरच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे कौतुक केले. ग्राम पंचायतींचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ जिल्हा परिषद गट स्पर्धा व जिल्हास्तरीय बक्षिस वितरण कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यात जिल्हा परिषद गट स्पर्धेत उमरोळी ग्राम पंचायतीला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा. पालकमंत्री यांच्या हस्ते उमरोळी चे ग्राम विस्तार अधिकारी श्री नितीन पवार यांना पारितोषिक देण्यात आले. ज्या पद्धतीने उमरोळी ग्राम पंचायतीने स्वच्छतेचा धडा घराघरात पोचवला व पूर्ण गाव हगणदारमुक्त केले. गावात घनकचरा व सांडपाणी याचे योग्य व्यवस्थापन करून गाव सुंदर व स्वच्छ करून जिल्ह्यात स्वच्छतेचा आदर्श ठेवला. यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत उमरोळी ग्राम पंचायतीला पुरस्कार प्राप्त करता आला. मिळाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी नितीन पवार याना रु ५० हजार व सन्मानचिन्ह याने गौरविण्यात आले.

What's New